प्रश्न-उत्तरे.

English | मराठी | తెలుగు | தமிழ்

टॅटल म्हणजे नेमके काय आहे?

भारतात जन्माला आलेला टॅटल हा एक नागरी-तांत्रिक प्रकल्प आहे ज्याचा प्रमुख उद्देश हा पडताळणी करून सत्य सिद्ध झालेली माहिती अधिक सहज पणे समजू शकेल अशा स्थानिक भाषांमध्ये प्रथमच मोबाईल वापरणाऱ्या लोकांपर्यंत पोचवणे हा आहे. व्हाट्सअँप चा वापर करून पसरणाऱ्या खोट्या माहिती आणि अफवांना तोंड देता यावे या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात झाली असली तरीही आता ह्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात इतर चॅट ऍप आणि encrypted network चा समावेश झाला आहे.

टॅटल चे ध्येय काय आहे ?

आमची अशी आकांक्षा आहे कि येणाऱ्या काळात आम्ही : व्हाट्सअप आणि इतर चॅट आप द्वारे पसरविल्या जाणाऱ्या खोट्या माहिती आणि अफवांचे आयुर्मान कमी करण्यास मदत करणे

    • खासगी आणि एन्क्रिप्टेड नेटवर्क च्या क्षेत्रात पारदर्शी आणि मुक्त संशोधना करिता मदत करणे

तुम्ही टॅटल च्या यशाचे मोजमाप कोणत्या प्रकारे कराल?

  • आम्ही मुक्त टूल्स (tools) चा एक कोष बनवत आहोत ज्याची मदत माहितीची शहनिशा करण्यासाठी /संशोधन करण्यासाठी होईल. या टूल्स च्या कामगिरी ची पडताळणी आम्ही सुरुवातीच्या आधाररेखेत (उपलब्ध असल्यास) सुधारणा झाली आहे की नाही या निकषावर करू.
  • नागरिक व माहितीची सत्यता पडताळणी करणारी लोकांकडून टूल्स वापरत आहेत की नाही यावरून आणि
  • सोशल मीडिया संदर्भात खोटी माहिती /अफवा या बाबतीती नवनवीन ज्ञानाची निर्मिती होत आहे की नाही यावरून आम्ही आमच्या यशाचे मोजमाप करू.

टॅटल ची तत्वे काय आहेत?

  • मुक्त विचार
  • सुलभता
  • शाश्वत क्षमता
  • विनम्रता
  • कौतुहल

आमच्या तत्तवांबद्द्ल चा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी हि माहिती वाचा

टॅटल चे काम कोणत्या प्रकारे परवानाकृत आहे?

  • कोड GPL करारा अंतर्गत आहे
  • तारीख ODbL करारा अंतर्गत आहे

टॅटल ची संघटनात्मक रचना अशी आहे?

टॅटल हि भारतात खासगी कंपनी म्हणून नोंदणीकृत केलेली आहे. आम्ही खासगी कंपनी म्हणून नोंदणीकृत होण्या मागे कायदेशीर बाबींचे पालन करताना होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. Al Ethics Initiate कडून आम्हाला आर्थिक साहाय्य मिळाले आहे. Denny आणि Tarunima हे दोघे या प्रकल्पाचे खूप कालावधी पासून काम पाहतात. आत्तापर्यंत या प्रकल्पाला अनेक स्वयंसेवक, मुक्त माहिती चे योगदान करणारे लोक आणि हंगामी काळासाठी कामावर घेतलेले लोक यांचे सहकार्य लाभले आहे. आम्ही कायमच नवीन लोकांच्या शोधात असतो.

मी तुमच्या कामात कशा प्रकारे मदत करू शकते/शकतो?

अनेक प्रकारे! जर तुम्ही एक सुजाण नागरिक , माहिती ची पडताळणी करणारे स्थानिक, कलाकार, लेखक, ग्राफिक डिझायनर , इंजिनिअर शिक्षक किंवा ऑनलाईन संवादा ला अधिक सुदृढ बनवण्या साठी उत्सुक असलेली व्यक्ती असाल तर आम्हाला तुमच्या सोबत एकत्र येऊन काम करायला नक्की आवडेल. आमच्या Contact Us पेज वर जाऊन आम्हाला संपर्क करा.

Text and illustrations on the website is licensed under Creative Commons 4.0 License. The code is licensed under GPL. For data, please look at respective licenses.