भारतातील प्रथम मोबाईलवापरकर्त्यां पर्यंत अचूक माहिती सहज पणे उपलब्ध व्हावी या उद्धेशाने आम्ही टॅटल ची सुरुवात केली. भारतातील जास्तीत जास्त लोक ऑनलाईन येत आहेत , आणि त्यांना इंटरनेट ची पहिली तोंडओळख हि व्हाट्सऍप सारख्या सोशल मेसेज ऍप द्वारे मिळत आहे. मजकूर किंवा संदेशाची निर्मिती ही फक्त विशिष्ट लोकांपुरती मर्यादित राहिली नसून जसे जसे जास्तीत जास्त सामान्य लोक इंटरनेट चा वापर करून माहिती व मजकूर (content) बनवत आहेत ,तसे तसे डिजिटल मीडिया चे नियम झपाट्याने बदलत आहेत. डिजिटल आणि मीडिया साक्षरतेच्या अभावामुळे ,हे नियम जन सामान्यांना विशेषतः गोंधळात टाकणारे असू शकतात. याचा परिणाम म्हणून , त्याचा वापर करणारे लोक हे अनावधानाने मिसइन्फॉर्मेशन म्हणजे अफवा व चुकीच्या माहितीचे (Mis information)चे वाहक ठरू शकतात. अशी माहिती व खोटी बातमी (fake news) ही खऱ्या बातमी सारखी आहे हा आभास निर्माण केला जातो व ती डिजिटल मीडिया द्वारे पसरवली जाते.
डिजिटल मीडिया व त्या अनुषंगाने नव्याने निर्माण झालेल्या प्रवाहांबद्दल चे कौतुहल टॅटल च्या कामामागची प्रेरणा आहेत. व्हाट्सऍप द्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा, खोट्या बातम्या व चुकीची माहिती पाहिल्या नंतर आम्ही लोकांचा ऑनलाईन संवाद अधिक संतुलीत आणि सुदृढ करण्यासाठी काय काय करता येईल या बद्दल विचार केला या सोप्या प्रश्नाचा शोध आम्हाला एका अनपेक्षित ज्ञानमय मार्गावर घेऊन गेला. गेल्या वर्षभरात, आमचा अनेक समुदायांशी जसे कि संशोधक, तथ्य-तपासक, पत्रकार व नागरी-तंत्रज्ञशास्त्रज्ञ अशांशी संपर्क आला, जे अतिशय निग्रहपूर्वक ऑनलाईन संवादाचा प्रश्न व त्यामधील अडथळे समजून घेण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी झटून काम करत आहेत. आम्हाला हेही कळून चुकले आहे कि हे आव्हान फक्त एका चॅट ऍप पुरते मर्यादित नाही तर त्याहून अधिक गुंतागुंतीचे आहे.
भारतीय एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक व्यासपीठे व संसाधने वापरतात आणि यामुळेच अफवा ह्या कल्पकतेने कोणत्याही संवादा द्वारे छुप्या पद्धतीने पसरवीता येऊ शकतात.
आमचे भागधारक हे केवळ आम्हाला आर्थिक, वेळेच्या स्वरूपात किंवा सल्लागार म्हणून मदत करत नाहीत तर ते आमचे हितचिंतकही आहेत. त्यामुळेच त्यांच्या विश्वासाचे चीज करण्याची जवाबदारी आमच्यावर आहे.
आम्हाला माहित आहे कि या झपाट्याने बदलणाऱ्या डिजियल मीडिया च्या इको सिस्टीम बद्दल'आमचा दृष्टिकोन हा वेळेनुसार सतत बदलणारा असला पाहिजे. आम्हाला म्हणूनच सुरुवातीलाच आमच्या मूल्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटते , जेणेकरून आमच्या मूल्यांचा आम्हाला भविष्यातील उत्पादने व इतरांसोबत एकत्र काम करताना मार्गदर्शक तत्वे म्हणून वापर करता येईल .
##'ओपन सोर्स' (Open Source) प्रकल्पांचे दीर्घकालीन लाभार्थी असल्यामुळे आम्हाला सामुदायिक रित्या रचना केलेले, सामुदायिक रित्या चालवलेले आणि सामुदायिक रित्या चलित साधनांचे महत्व लक्षात आले आहे. ओपन सोर्स प्रकल्प चालविण्याचे अनेक व्यावहारिक फायदे आहेतच, पण टॅटल जे साध्य करू इच्छिते त्या उद्दिष्टांसाठी साठी हे अधिकच महत्वाचे आहे. अफवा व चुकीच्या बातम्या हा एकाच वेळी जागतिक व सामाजिक प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त एका व्यासपीठा किंवा एकाच संघापुरता मार्गदीत नाही. या संदर्भातील कोणतीही उपायोजना हि दीर्घकालीन व अनेक-स्तरीय असावी लागेल .
टॅटल द्वारे बनवल्या गेलेल्या साधनांचा कोणीही मुक्त पणे वापर करू शकतो, त्यात बदल करू शकतो व त्याचे वाटप करू शकतो. आम्ही या मुक्तपणाशी (openness ) वचनबद्ध आहोत. हे मुक्तपणाचे तत्व फक्त tattle ने प्रकाशित केलेल्या सॉफ्टवेर पुरते मर्यादित नसून (सर्व सॉफ्टवेर GPL परवानकृत आहेत) आमच्या संवादा मध्ये ही मुक्तता आह े व आम्ही सर्व बाबतीत लोकांच्या सहभागाला महत्व देतो. आम्ही जाणतो की सर्व प्रक्रियेत मुक्तपणा असेल तरच हा प्रकल्प 'Commons' म्हणून विकसित होऊ शकेल.
वैविध्येतेने समृद्ध असलेल्या जगाची भारत एक सूक्ष्म प्रतिकृती आहे. भाषेतील, अनुभवातील , शिकण्याच्या पद्धती मधील व आदानप्रदानच्या त्या वैविध्यतेला आम्ही टॅटल द्वारे अंगिकारवे हे आमचे ध्येय आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्यांपर्यंत आमचे काम सुलभतेने पोहोचावे हे आमचे ध्येय आहे.
विविध प्रकल्प कल्पना व आणि भविष्यातील संभाव्य दिशा यात कोणत्याही क्षणी आम्हाला निवड करावी लागेल. . टॅटल ज्या आव्हानांना सामोरे जाऊन मार्ग शोधू इच्छिते त्या पार्श्वभूमीवर अपारंपरिक सामाजिक-तांत्रिक दृष्टीकोनाची गरज निर्माण झाली आहे. परंतु नवनवीन कल्पना राबवीण्या आधी संस्थेच्या चालू असेलेल्या प्रकल्पांची दीर्घा कालिन व्यवहार्यता व संस्थेचा समग्रतेने विचार याचे संतुलन साधावे लागेल. एखादी नवीन कल्पना राबविण्या आधी आम्ही तिचा संस्थेची संरचना व तांत्रिक रचना या दोन्ही चा दूरदृष्टीने शाश्वत दृष्टिकोनातून विचार करू.
आम्ही हे जाणून आहोत कि आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे अनेक अनुभवी व्यक्ती व संस्था अस्तित्वात आहेत व त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहे. सोशल मीडिया व्यासपीठाचा वापर करणाऱ्यांकडूनही कडूनही आम्ही अनेक गोष्टी शिकू शकतो! विनम्रतेच्या मूल्याचा स्वीकार म्हणजे आम्ही ही जाणीव ठेवणे की आम्ही सगळ्यात पाहिल्यादा एका श्रोत्याची व विद्यार्थ्याची भूमिका पार पडली पाहिजे व लोकांच्या अनुभवांना आमच्या कल्पनांपेक्षा जास्त महत्व दिले पाहिजे.
ब्लॉग मध्ये आधी सांगिल्या प्रमाणे, कौतुहल हि टॅटल ची प्रेरणा आहे. आमची सुरुवात हि मिस इन्फॉर्मेशन बद्दल अधिकाधिक
जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून आणि लोक जे शेयर करतात ते नेमके का करतात हे समजून घेण्याच्या उद्देशाने झाली.
एका वर्षात आमच्या कडे अजूनही अनेक उत्तर ना सापडलेले प्रश्न आहेत आणि कोणकोणत्या गोष्टीं मधून या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात या बाबतीत काही गृहीतके हि आहेत.
आमची वेगवेगळ्या लोकांकडे, कल्पनांकडे, तंत्रज्ञानाकडे आणि नवनवीन आव्हानांकडे बघण्याची अमर्याद उत्सुकता आम्हाला आमच्या कामाचा परीघ वाढवण्यास मदत करत आहे.
अतिशय उद्दात आहेत आणि आम्ही त्यांची अनेकदा वाटत असूनही पूर्तता करू शकणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. पण तरीही सुरुवातीलाच आमची सुस्पष्ट मूल्ये लोकांसमोर मांडून आम्ही गगनभरारी घेत आहोत. आमची स्वप्ने व आदर्श मोठे आहेत, व सध्या आम्ही
त्या ठिकाणी पोचलो नसलो तरीही आमची अशी आशा आहे कि आमची पार दर्शक तत्वे या प्रवासात मार्गदर्शन करतील व आम्ही कमी पडल्यास आम्हाला अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित करतील.